Home Remedies: अनेक लोकांच्या घरात उंदरांनी हैदोस घातलेला असतो. कपडे असो, रद्दी असो, वायर असो वा अजून काही असो ते कुरतडणं सुरू करतात. उघड्यावर अन्न किंवा फळं ठेवली असतील तर त्यावरही ताव मारतात. अशात उंदरांपासून लवकर सुटका मिळवणं फार गरजेचं असतं. तुमच्या घरातही उंदीर झाले असतील तर आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत जे करून तुम्ही त्यांना घरातून बाहेर पळवून लावू शकता.
कांद्याचा वापर
कांद्याचा वास फारच उग्र असतो. कांदा खाल्ल्यावर तोंडाचा वास येतो. कांद्याचा हाच वास उंदरांसाठी काळ ठरतो. उंदीर कांद्यांचा वास येताच पळून जातात. यासाठी केवळ इतकं करा की, जिथे उंदीर आहेत तिथे कांदा कापून ठेवा. काही दिवसात रिझल्ट दिसेल.
लसणाने होईल फायदा
कांद्यासोबतच तुम्ही उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी लसणाचीही वापर करू शकता. लसूण बारीक करून एका छोट्या बॉटलमध्ये टाका आणि त्यात थोडं पाणी टाका. हे पाणी उंदरांच्या बिळांवर शिंपडा आणि घराच्या रस्त्यावरही थोडं टाका. उंदीर या पाण्याच्या वासाने घरात येणार नाहीत.
लवंगाचं तेल
घरात उंदीर जिथे जास्त राहतात त्या ठिकाणी लवंग कापडात गुंडाळून ठेवा. या कपड्यावर थोडं लवंगाचं तेलही शिंपडा. याने उंदरांना श्वास घेण्यास समस्या होते आणि मग ते बिळातून बाहेर निघू लागतात.
मिरचीने मरतील उंदीर
उंदीर पळवून लावण्यासाठी मिरची सुद्धा फायदेशीर ठरते. लाल मिरच्या बारीक करा आणि मग चिली फ्लेक्स घेऊन पाण्यात मिक्स करा. या पाण्याला एक उकडी येऊ द्या. पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. उंदरांवर हे पाणी शिंपडल्याने त्यांना जळजळ होते. अशात ते पळून जातात.
बटाट्याचं पावडर
बटाट्याचा वापर उंदीर मारण्यासाठीही केला जाऊ शकतो. यासाठी उंदरांवर, घराच्या रस्त्यावर, उंदरांच्या बिळावर आणि उंदीर असू शकतात अशा ठिकाणांवर बटाट्याचं पावडर टाका. उंदीर याने पळून जातील.