How to clean black tawa : किचनमधील वेगवेगळ्या महत्वाच्या भांड्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तवा. तव्यावर चपात्यांसोबत वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात जसे, भाजणं, तडका देणं, भाकरी करणं इत्यादी. सामान्यपणे सगळ्याच घरांमध्ये एकच तवा अनेक वर्ष वापरला जातो. त्याला पुन्हा पुन्हा वापरून आणि त्यावर तेल, अन्न जमा होऊ तो काळा झालेला असतो. अशात तुम्हाला जर तुमचा काळा झालेला तवा चमकवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही काळा झालेला तवा चमकदार करून शकता तेही काही मिनिटात. महत्वाची बाब म्हणजे फार स्वस्तात तुम्ही हे काम करू शकता.
काळा तवा चमकवण्याच्या खास टिप्स
पहिला उपाय
- काळा झालेला तवा चमकदार करण्यासाठी लिंबू, मीठ आणि शाम्पूचा वापर करू शकता. या उपायाने तुमचा काळा झालेला तवा, त्यावरील चिकट डाग लगेच दूर होतील. यासाठी थोडं शाम्पू घ्या, त्यात थोडं मीठ टाका आणि एका लिंबाचा रस टाका.
- सगळ्यात आधी तव्याला गॅसवर ठेवून काही वेळ गरम करा. आता गरम तव्यावर शाम्पू टाका, त्यात एक चमचा मीठ टाका आणि थोडा लिंबाचा रस टाका. हे तव्यावर चांगलं पसरवा.
- यानंतर लिंबाच्या सालीने तवा चांगला घासणं सुरू करा. याने तव्यावर जमा तेल, डाग साफ होतील. काही वेळाने गॅस बंद करा आणि तवा सिंकमध्ये ठेवून डिश वॉश जेल आणि स्क्रबने घासा. तवा तुम्हाला आधीपेक्षा जास्त साफ झालेला दिसेल.
दुसरा उपाय
काळा झालेला तवा साफ करण्यासाठी आणखी एक उपाय आहे. एका वाटीमध्ये थोडा लिंबाचा रस घ्या. त्यात मीठ, थोडं डिटर्जेंट पावडर आणि थोडी बारीक वाळू मिक्स करा. जर वाळू नसेल तर विटेचा तुकडा बारीक करून ते टाका. आता ब्रशच्या किंवा भांडे घासणीच्या मदतीने तवा घासा. तवा साफ होईल.
तिसरा उपाय
तवा साफ करण्यासाठी आणखी एक तिसरा उपाय म्हणजे व्हाईट व्हिनेगर. तवा गरम करा त्यावर थोडा लिंबाचा रस आणि व्हाईट व्हिनेगर टाका. त्यानंतर स्क्रबच्या मदतीने तवा घासा. याने तव्यावरील चिकट पदार्थ आणि काळे डाग निघून जातील.