कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. सुरूवातीच्या दिवसांपेक्षा लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. असं असलं तरी अत्यावश्यक सेवांशी निगडीत काम असल्याशिवाय लोकांना घराबाहेर पडता येत नाही. सतत घरी बसून लोकांना खूप कंटाळा आला आहे. तर दुसरीकडे प्राण्याचा आणि पक्ष्याचा सामसुम असलेल्या वातावरणात मुक्त संचार सुरू आहे. गेल्या काही दिवसात असे अनेक व्हायरल व्हिडीओ आणि फोटो आपण पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत.
या व्हिडीओत ऐरवी माणसांनी गजबजलेल्या असलेल्या रस्त्यांवर मोरांनी ट्रॅफिक जॅम केलं आहे तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. संपूर्ण रस्त्यावर मोरांनी ट्रॅफिक जॅम केलं आहे. हा सुंदर व्हिडीओ प्रविण कासवान यांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर मोरांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीयोला एक लाख व्हिव्हज आणि १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसंच २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोर पिसारा फुलवून नाचत आहेत. तर काही मोर इकडे तिकडे फिरताना दिसून येत आहेत. लॉकडाऊनच्या आधी तुम्ही फक्त गाड्यांमुळे झालेलं ट्रॅफिक जॅम पाहिले असेल. लॉकडाऊनच्या काळात मोरांमुळे झालेलं ट्रॅफिक जॅम दिसून आलं आहे.
साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी
लय भारी! उन्हाळात राबणाऱ्या जवानासाठी बनवली छत्री; पाहा 'या' छत्रीची खासियत न्यारी