नवी दिल्ली - सोशल मीडियावर नवनवीन गोष्टी, व्हि़डीओ हे सतत व्हायरल होत असतात. असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरदावर सर्वकाही साध्य करता येतं हेच एका तरुणाने सिद्ध केलं आहे. एक पाय नसतानाही त्याने हार नाही मानली. अनोखी शक्कल लढवून वाऱ्याच्या वेगाने सुसाट सायकल चालवल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या जिद्दीला सलाम असून त्याचा हा काळजाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सायकल चालवताना दोन्ही पायाने पँडल मारणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण एका तरुणाने एकाच पायाने सायकल चालवून दाखवली आहे. त्याने फक्त सायकल चालवलीच नाही तर अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पळवून दाखवली आहे. रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासीही त्याला पाहून थक्क झाले आणि त्यांनी या व्यक्तीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एकच पाय असलेल्या या व्यक्तीने सायकल चालवताना अनोखी शक्कल लढवली आहे. आपला एक पाय सायकलच्या एका पँडलवर ठेवला आहे आणि दुसरा पँडल मारण्यासाठी त्याने काठी वापरली आहे.
एक पाय नाही पण हार नाही मानली, शक्कल लढवत सायकल चालवली
एका हातात काठी घेऊन त्याने दुसऱ्या पायाने पँडल फिरवत आहे. अशा पद्धतीने ही व्यक्ती सायकल चालवते आहे. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हिंमत अशी असेल तर कोणतीच समस्या तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. खूप जणांनी तो लाईक केला आहे. हा तरुण म्हणजे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या हिमतीला, जिद्दीला सर्वांनी सलाम केला आहे. सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक केलं जातं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.