शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

आता मानवाच्या मूत्रावरही चालणार वाहने; 'या' कंपनीने विकसित केले अनोखे तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:25 AM

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा तेलाच्या वाढलेल्या भावामुळे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर रामबाण उपाय म्हणून जर मानवाच्या मूत्रावर वाहने धावू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. साहजिकच यावर विश्वास ठेवणे कठीण आहे मात्र हे सत्य आहे. कारण अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या अनोखे तंत्रज्ञान विकसित करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

इंधनाशिवाय चालणार वाहनेपेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे जगभरातील सरकारे आणि कंपन्या इंधनावर उपाय काही इतर मार्ग शोदत आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या इंधनाशिवाय कशा धावतील यावर विचारविनिमय सुरू आहे. मात्र मानवाच्या मूत्रावर देखील वाहने धावू शकतात असे अमेरिकेतील एका कंपनीने सिद्ध केले आहे. अमेरिकन कंपनी अमोगी (American company Amogi)या कंपनीने अमोनियाद्वारे ट्रॅक्टर चालवून दाखवला आहे. विशेष म्हणजे मानवाच्या मूत्रामध्ये मुबलक प्रमाणात अमोनिया आढळतो.

दरम्यान, जगभरात इंधनाचा तुटवडा भासत आहे मात्र मानवी मूत्राचा तुटवडा कधीच भासणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच लोकांना आता मूत्राद्वारे देखील ट्रॅक्टर चालवता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात अमोनियाचा इंधन म्हणून वापर केल्यास ते फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे. 

जहाजांवरही करणार प्रयोगमाहितीनुसार, संबंधित कंपनीने अमोनिया तोडणारी अणुभट्टी तयार केली आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला आहे. त्यामुळे आपण मानवी मूत्राचा थेट इंधन म्हणून वापर करू शकत नाही कारण ते इंधनायोग्य होण्यासाठी काही प्रक्रिया होणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, लघवीला अमोनियामध्ये बदलले जाऊ शकते आणि नंतर त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. कंपनीने सध्या या तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त ट्रॅक्टर चालवण्यासाठी केला आहे. परंतु आगामी काळात हे अनोखे तंत्रज्ञान समुद्रातील जहाजही चालवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलPetrolपेट्रोलDieselडिझेलInflationमहागाईAmericaअमेरिका