सोशल मीडियावर सध्या या बाप लेकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही गायनाच्या रियाजाचे किंवा जुगलबंदीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण असा व्हिडीओ पाहिला नसेल. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता वडील आणि चिमुरडा हे दोघे गायनाचा सराव करत आहेत. या चिमुरड्याचा उत्साह पाहण्यासारखा आहे. इतक्या लहान वयात वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत हा चिमुरडा गायनाचा रियाज करत आहे. वडिल पेटी वाजवत सूर लावत असताना चिमुरडा गाणं म्हणण्याची घाई करत आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. या मराठमोळ्या बापलेकाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. वडील गाणं म्हणत असताना 'मलाही बोलू द्या' असं म्हणणाऱ्या चिमुरड्याने अनेकांनी मनं जिंकून घेतली आहेत. सावकाश बोला असं म्हणत हा चिमुरडा वडिलांच्या मागे मागे सूर लावत आहे. Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल
Child is the Father of Man !. असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत ३८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे, तर ५ हजारापेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अत्यंत उत्साहात, हातवारे करत हा चिमुरडा गाणं म्हणत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नशीबाने थट्टा कशी मांडली! सुवर्णपदक विजेती तरूणी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी करतेय 'हे' काम