लग्न म्हटलं की अनेक गमती-जमती या आल्याच. लग्नाचे अनेक भन्नाट किस्से हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. पंजाबमधील अमृतसरमधून असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. लग्नामध्ये डीजेवर डान्स करताना घरातील लोक नोटांचा पाऊस पाडताना दिसत आहेत.
लग्नात उडवलेले पैसे तिथे उपस्थित असलेल्या डीजे किंवा वेटर्सना दिले जातात. काही ठिकाणी डीजेच्या तालावर नाचणाऱ्या लोकांमध्ये नोटा हवेत उडवल्या जातात. यानंतर काही वेळा डीजे आणि वेटर्समध्ये ते उचलण्यासाठी धक्काबुक्की सुरू होते. असंच काहीस पंजाबमध्येही पाहायला मिळालं आहे. पंजाबमधून समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
नोटा फुलासारख्या उडवल्या जात आहेत जणू काही त्याची किंमतच नाही. डीजेच्या तालावर डान्स करताना लाखो रुपयांच्या नोटा उडवण्यात आल्या. एकामागून एक नोटा उडवण्याची स्पर्धा लागलेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जमिनीवर सर्वत्र फक्त नोटा विखुरलेल्या दिसतात. नाचत नाचत लोक नोटा हवेत उडवत आहेत. यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये लोक त्या नोटा उचलताना पाहायला मिळत आहेत.
लोक जमिनीवर पडलेल्या नोटा दोन्ही हातांनी गोळा करताना दिसत आहेत. यामध्ये केवळ डीजे वा वेटरच नाही तर लग्नाला उपस्थित असलेले लोकही दोन्ही हातांनी नोटा गोळा करून पँटच्या खिशात, कोटाच्या खिशात भरत असतात. यादरम्यान काही महिला देखील नोटा गोळा करताना दिसत आहेत. नोटा जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"