Social viral : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक्सवर पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्या व्हिडीओला लोकांची सर्वाधिक पसंती मिळतेय.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जम्मू- काश्मिरमध्ये बर्फवृष्टी सुरु झाली असून येथे दोन काश्मिरी मुलींनी बर्फवृष्टीवर केलेल्या लाईव्ह रिपोर्टींगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल होणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून दोन चिमुकल्या मुली आपला आनंद व्यक्त करतायत. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलींनी मोठ्या आनंदाने बर्फात खेळत व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्यामुळे बर्फवृष्टीनंतर येथे त्यांना स्वर्गात आल्यासारखे वाटत आहे. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि हिमवर्षाव सुरु केला, असं देखील त्या म्हणतायत. या दोन्ही मुली बर्फामध्ये मनसोक्त खेळताना दिसत आहेत. शिवाय ही दुधाची लाट नसून हिमवर्षाव असल्याचे मुली सांगत आहेत.
त्याव्यतिरिक्त मुली म्हणतात, आम्ही येथे बर्फवृष्टीचा आनंद घेत आहोत. बर्फ इतका खोल आहे की आम्ही त्यात बुडुन जाऊ. येवढा भलामोठा बर्फाचा लोट पाहून आम्हाला सुमद्रात असल्यासारखे वाटत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये या मुलींची आई त्यांना प्रश्न विचारते कसे वाटते आहे, तुम्हाला थंडी नाही लागत का? यावर मुलींनी मजेशीर उत्तर दिले. त्यावर मुली म्हणतात थंडी तर वाजतेय पण मजा करायची आहे ना? मुलींच्या या उत्तरावर सोशल मीडियावर लोकांना प्रतिक्रिया केल्या आहेत.
या लहान मुलींच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव केलाय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केलाय.