नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिवस जवळ येताच सोशल मीडियावर (Social Media) सगळीकडे देशभक्तीचे वातावरण तयार होत असते. यंदा भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देशामध्ये 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ आणि भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षाच्या स्मरणार्थ प्रेरित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचे उद्दिष्ट ध्वजाशी वैयक्तिक बंध निर्माण करणे आणि ते देशात एकत्र येणे हे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर जवानांनी आपले जीव गमावले आहेत. सध्या अशाच एका वीर शहीद जवानाचा (Martyred Soldier) जीवनप्रवास सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओने जिंकली मनेव्हायरल व्हिडीओमध्ये एका शहीद जवानाचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. कलाकाराने केलेल्या त्याच्या कलेचे सर्वजण विशेष कौतुक करत आहेत. कागदाचे एक-एक पान उघडताच शहीद जवानाच्या आयुष्यातील नवे चित्र समोर येते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, जवान घरातून सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी जात आहे. यानंतर रणांगण दाखवण्यात आले आहे, जिथे वीर जवान आपल्या देशासाठी शहीद होतो.
डोळ्यातून पाणी आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप पसंती दिली असून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. शहीद जवानाचा मनावर घाव घालणारा जीवनप्रवास मांडणाऱ्या कलाकाराला सलाम सोशल मीडियावरील युजर्स सलाम ठोकत आहेत. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी अंगावर गोळी झेलणाऱ्या या वीरांना अभिवादन अशा आशयाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
देशभर हर 'घर तिंरगा मोहिमे'चे आयोजन हर घर तिरंगा मोहिम ही मोहिम संपूर्ण देशभर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण भारतातील नागरिकांना २ ऑक्टोबर पासून सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटोला तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे.