VIDEO:इंजिनीअरिंगचा नमुना की निष्काळजीपणा? चक्क रेल्वे रूळावरच उभारला विजेचा खांब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:53 PM2022-08-24T15:53:11+5:302022-08-24T15:56:12+5:30
सोशल मीडियावर सध्या रेल्वे रूळाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या रेल्वे रूळाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण देखील खूप भन्नाट आहे. कारण चक्क रेल्वे रूळाच्या पटरीमध्येच वीजेचा खांब उभारण्यात आला आहे. तुम्ही अनेकवेळा रेल्वे रूळाच्या आजूबाजूला असलेले वीजेचे खांब पाहिले असतील मात्र हा विचित्र ठिकाणी असलेला खांब सर्वांचे लक्ष वेधत आहे. हा इंजिनीअरिंगचा नमुना आहे की निष्काळजीपणा यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. जिथे रेल्वेची तिसरी लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच तिसरी लाईन टाकण्याचे काम सुरू असताना इंजिनीअरने रेल्वे रूळाच्या मध्यभागी मधोमध वीजेचा खांब उभारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सड़क पर बिजली के खंभे के तो कई मामले सामने आ चुके हैं, लेकिन रेल की पटरियों के बीच ऐसा पहली बार दिख रहा है। मामला मध्यप्रदेश के सागर जिले के ईसरवार स्टेशन का है। pic.twitter.com/BXtBYDtuKa
— Avadhesh Akodia (@avadheshjpr) August 23, 2022
स्मार्ट इंजिनिअरिंगचा नमुना की निष्काळजीपणा?
व्हायरल होणारा व्हिडीओ ईसरवारा रेल्वे स्थानकाजवळील असून स्थानिक पत्रकाराने ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "रस्त्यावर विजेचे खांब उभारल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, परंतु मी हे पहिल्यांदाच रेल्वे रुळावर पाहिले आहे." काही लोक याला रेल्वेचा निष्काळजीपणा म्हणत आहेत, तर काहीजण स्मार्ट इंजिनिअरिंगचा नमुना सांगत आहेत.