नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर करताच जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील सायकलस्वाराला पाहून ते जबरदस्त इंस्पायर झाले असून त्यांनी या सायकलस्वाराचे कौतुक करणारे ट्विटही केले आहे.
सायकलस्वार तरुणाच्या या व्हिडिओने आनंद महिंद्रांना आकर्षित केले आहे. या व्हिडिओतील हा तरूण डोक्यावर ओझे असतानाही सायकलच्या हँडलला हात न लावता, संपूर्ण वेगाने सायकल चालवताना दिसत आहे. त्याने आपल्या दोन्ही हातांनी डोक्यावरील ओझे पकडले आहे. रस्तयावर या तरुणाच्या सायकलचा वेग आणि तिच्यावर असलेले त्याचे नियंत्रण दोन्हीही बघण्यासारखे आहे.
हा व्हिडिओ शेअर करत महिंर्दा यांनी लिहिले आहे, "हा मनुष्य एक मानवी सेग्वे (Segway) आहे. याच्या अंगात आधीपासूनच gyroscope (एक प्रकारचे सेंसर) फिट आहे. काय जबरदस्त बॅलेंस आहे. मला या गोष्टीचे वाईट वाटते, की या माणसासारखे अनेक टॅलेंटेड लोक आपल्या देशात असतील, जे जिम्नास्ट अथवा स्पोर्टपर्सन होऊ शकतात. मात्र, त्यांना शोधणे आणि प्रशिक्षण देणे सोपे नाही." आनंद महिंद्रा यांनी शेअर करताच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर विविध प्रकारच्या रिअॅक्शन्सदेखील येत आहेत.