अनेकांचे आपल्या कारवर खूप प्रेम असते. बरेचजण मेहनत करून आपलं कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. बिहारमधील एका व्यक्तीने चक्क त्याच्या स्कॉर्पिओ गाडीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी घराच्या गच्चीवर गाडीची प्रतिकृती उभी केली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील इंतसर आलम यांनी आपल्या आयुष्यात स्कॉर्पिओ ही गाडी पहिल्यांदा खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या चार मजली घरावर स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी उभी केली आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गच्चीवर या गाडीचे सेम मॉडेल तयार केले गेले असून सेम क्रमांकाची नंबर प्लेट देखील लावण्यात आली आहे. गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. या स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना या माणसाच्या पत्नीची होती. उत्तर प्रदेशच्या आग्राच्या ट्रीपवेळी तिच्या डोक्यात ही कल्पना आली होती. मग या टाकीच्या आकाराचा विचार करत असताना डोक्यात स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना आली होती. त्यानंतर यासाठी आग्र्यावरून कामगार आणत हे काम सुरु केले. या संपूर्ण कामासाठी त्याला अडीच लाख रुपये खर्च आल्याचे त्याने सांगितले. मालकाची ओढ! हरवलेल्या कुत्र्यानं २६ दिवस पायपीट करत ६० किमी रस्ता केला पार
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या पाण्याच्या टाकीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कमेंट केली आहे. स्कॉर्पिओ ही महिंद्रा ग्रुपची निर्मिती आहे आणि त्याचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना ही कल्पना आवडली. ट्विटरवरील पोस्टमध्ये आनंद व्यक्त करत आनंद महिंद्रा म्हणाले की, "आता यालाच मी एक राइज स्टोरी म्हणतो. स्कॉर्पिओ राइजिंग टू द रूफटॉप. त्यांच्या पहिल्या कार प्रेमाला माझा सलाम.'' संपूर्ण बिहारमध्ये या गाडीविषयी क्रेझ आहे. या भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना स्कॉर्पिओसारख्या मजबूत आणि टिकाऊ गाड्यांची गरज भासते. बिहारमधील अनेक राजकीय नेत्यांकडेदेखील स्कॉर्पिओ असतात. तेरी मेहरबानिया! २ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पाहिला अन् मालकानं जीव दिला