anand mahindra motivational videos । नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते नेहमी प्रेरणादायी फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करून तरूणाईला सल्ले देत असतात. ते अनेकदा नवीन तंत्रज्ञानाबद्दल, भविष्यातील शक्यता आणि गरजांबद्दल माहिती लोकांशी शेअर करतात. देशात आणि जगात कुठेही चांगल्या गोष्टी घडत असतील तर ते सर्वांना सांगतात. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून प्रेरणादायी संदेश दिला आहे.
दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घोडा पाण्यात धावताना दिसत आहे. सुमारे 11 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तो पाण्यात कसा सहज धावतो हे तुम्ही पाहू शकता. पाण्यात धावणे सोपे नाही याची सर्वांना कल्पना आहे. एका संशोधनानुसार, जर तुमचा वेग 67 mph पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही पाण्यात सहज धावू शकता. यापेक्षा कमी वेग असेल तर पाण्यात अजिबात धावता येत नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण पाण्यात धावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण थकून जातो.
आनंद महिंद्रा यांनी दिला प्रेरणादायी मेसेज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहले, "तुम्ही पाण्यावरही चालू शकता पण त्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हा सगळा मनाचा खेळ आहे. तुमच्या आठवड्याची सुरुवात स्वतःवर आणि तुमच्या आकांक्षांवर विश्वास ठेवून करा." हा व्हिडीओ आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सुमारे सहा हजार लोकांनी लाईक केले असून शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, "नक्कीच सर! शाओलिन मास्टर्सना हे करताना पाहिले, वेदशास्त्रातही ऐकले आणि वाचले आहे. हे एक मार्शल आर्ट आहे आणि प्राचीन काळापासून लोक याचा सराव करत आले आहेत."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"