महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. ते देशातील वेगळ्या घटना तसेच वस्तुंवर आपले मत मांडत असतात. जुगाड करुन बनवलेले वाहनांची ते दखल घेतात, गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी सांगलीतील एका व्यक्तीने बनवलेल्या कारचे जुगाड शेअर करुन त्या व्यक्तीला बुलेरो भेट दिली होती. आता असाच एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे, हा व्हिडिओ ३१ सेकंदाचा आहे.
१ डिसेंबर रोजी हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ग्रामीण भागातील असल्याचा दिसत आहे. या व्हिडिओत ६ सीटर इलेक्ट्रीक बाईक दिसत आहे. त्यांनी हा या व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, मी नेहमी ग्रामीण भागातील असे ट्रान्सपोर्ट पाहून इम्प्रेस होतो, असं त्यांनी यात म्हटले आहे.
ही बाईक १० ते १२ हजारात तयार झाली आहे, एकवेळ चार्ज केल्यानंतर ती बाईक १५० किलोमीटर चालते. चालकासहीत या बाईकवरुन ६ जण प्रवास करु शकतात. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी १ डिसंबर रोजी शेअर केला. या बाईकमध्ये काही बदल करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा उपयोग होऊ शकतो, युरोप मधील गर्दीत या बाईकचा चांगला वापर होऊ शकतो, असं महिंद्रा यांनी यात म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला आतापर्यंत ३० हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून, ४ हजार रिट्विट मिळाले आहेत. यात अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने यात म्हटले, भारतात टॅलेंटला कमी नाही.