आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. यादरम्यान त्यांनी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात २० किलोमीटरची जीप सफारी केली. व्याघ्र प्रकल्पातील सफारीदरम्यान ते महिंद्रा कारमध्ये दिसले. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता यातील एक फोटो द्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जंगल सफारी, काँग्रेसने इंदिरा गांधींचा फोटो शेअर करुन केला सवाल
"मला का वाटते हा पंतप्रधानांच्या बंदिपूर भेटीचा सर्वोत्तम फोटो आहे, असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या या पोस्टवरही आता ट्विटर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत.
पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर जंगल सफारीचा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले- 'बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सकाळ घालवली आणि भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेची सुंदर झलक पाहिली.'
याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर अकाऊंटवर एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी अगदी खास लूकमध्ये दिसत आहेत. मोदींच्या जंगल सफारीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.