कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे. इतक्या कठीण काळातही लोक सगळं काही व्यवस्थित होण्याची आशा करत आहेत. मागच्यावर्षी जेव्हा कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहायला मिळाल तेव्हा लोकांनी एकमेकांची मदत केली होती. त्याचवेळी सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोला (Coca-Cola Advertisement) जाहिरात वेगानं व्हायल होत होती. आनंद महिंद्रांनी आता पुन्हा एकदा पोस्ट करून कोका कोला कंपनीला धन्यवाद दिलं आहे.
हा व्हिडिओ गेल्या वर्षी कोरोना साथीच्यानंतर लवकरच प्रसिद्ध करण्यात आला होता, जाहिरातही याचाशी संबंधित आहे. कारण भारतात कोविड -१९ ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हा व्हिडिओ सांगतो की गरजू लोकांना मदत करण्यासाठी इतर लोक एकत्र कसे आले.
दोन मिनिट १४ सेकंदाचा व्हिडिओ "मानवतेचा नायक" या संदेशासह समाप्त होईल. त्यांनी लिहिले, 'दयाळूपणा आणि आशेने ग्लास भरल्याबद्दल धन्यवाद.' जाहिरात शेअर करताना आनंद महिंद्राने लिहिले, 'आशावाद. एक सार्वभौम धर्म जो आपल्या सर्वांचा असू शकतो… धन्यवाद कोका कोला.
बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स
त्यांनी हा व्हिडिओ २९ एप्रिल रोजी शेअर केला होता. ज्यास आतापर्यंत ३० हजारांहून अधिक व्हिव्हज मिळाले आहेत. तसेच, एक हजाराहून अधिक लाईक्स आणि ३०० हून अधिक री-ट्वीट झाले आहेत. लोकांनी या व्हिडिओचे सुंदर अशा शब्दात वर्णन केले. एका वापरकर्त्याने लिहिले, 'हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले.' कमेंट्स विभागात लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या ते तुम्ही पाहू शकता.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेला भारताला सामोरे जावे लागले आहे, ज्याचा परिणाम रूग्णालयांवर झाला आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील खाली आला आहे. गेल्या एका आठवड्यापासून दररोज 3 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.