असं म्हणतात की जुगाडाच्या बाबतीत देशी लोकांचा सामना कोणीही करू शकत नाही. सोशल मीडियावरील एका जुगाडाच्या व्हिडीओनं नेटिझन्सना चकीत केले आहे. व्यावसाईक आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारात पडाल की इंजिनला दोरी जोडून कशी काय कार चालवली जाऊ शकते?
हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ४ फेब्रुवारीला ट्विटरवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, '' हा व्हिडीओ जुना वाटतो पण खूप इंटरेस्टिंग आहे.'' तुम्ही हा व्हिडीओ पाहून जुगाड करणाऱ्याचं कौतुक कराल. १७ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले असून हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या माणसानं कारमध्ये बिघाड झाल्यानंतर ती दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कारचे एक्सीलेटर काम करणं बंद करते. त्यावेळी असं होतं. विशेष म्हणजे या जुगाडानं कार चालू होते ही मोठी गोष्ट आहे.
कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ
आधीही आनंद महिंद्रांनी ट्रेनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोनं आनंद महिंद्रांचे मन जिंकले होते. हे दृश्य मुंबईच्या एका रेल्वे स्टेशनवरचे आहे. या ठिकाणी लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्यानं ट्रेनवर(Railway local) डोकं ठेवून नमस्कार केला आहे. कोणीतरी हा फोटो कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला.
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रानी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'भारताचा आत्मा, मी प्रार्थना करतो की आपण हे कधीही गमावणार नाही.' आतापर्यंत या फोटोला ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ३६८ पेक्षा जास्त ट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो