Viral Video: आनंद महिंद्रांनी शेअर केला युक्रेनचा असा व्हिडिओ, जो पाहुन तुमचे डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:52 AM2022-03-01T10:52:29+5:302022-03-01T10:52:47+5:30

बिजनेसमॅन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन युक्रेनियन सैन्याचा (Ukraine Army Viral Video) एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून लोक भावुक झाले आहेत.

Anand Mahindra shares emotional video on twitter about Ukraine | Viral Video: आनंद महिंद्रांनी शेअर केला युक्रेनचा असा व्हिडिओ, जो पाहुन तुमचे डोळे पाणावतील

Viral Video: आनंद महिंद्रांनी शेअर केला युक्रेनचा असा व्हिडिओ, जो पाहुन तुमचे डोळे पाणावतील

Next

रशियन-युक्रेन युद्धादरम्यान सोशल मीडियावर लोक आपलं मत व्यक्त करीत आहेत. सर्वजण युक्रेनच्या लोकांचं कौतुक करीत आहेत. विशेषत: जे लोक हत्यारं उचलण्यासाठी मागे-पुढे पाहत नाहीत अशांचंही कौतुक करीत आहेत. सध्या संपूर्ण जग रशिया-युक्रेनमधील संघर्षाकडे लक्ष देऊन आहे. यादरम्यान बिजनेसमॅन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन युक्रेनियन सैन्याचा (Ukraine Army Viral Video) एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून लोक भावुक झाले आहेत.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओ दाखविण्यात आलं आहे की, यूक्रेनचे (Ukraine Latest News) सैन्य आपली ओळख वडील, ड्राइवर, विद्यार्थी, बिजनेसमॅन म्हणून करीत आहेत. व्हिडीओच्या शेवटी एक मनाला स्पर्श करणारा संदेश देण्यात आला आहे. आमच्यापैकी कोणीही युद्धासाठी जन्माला आलेलं नाही, मात्र देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत. हा व्हिडीओ सध्याच्या परिस्थितीत तंतोतंत जुळतो.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन यांनी हा व्हिडीओ शेअर करून एक संदेश दिला आहे. हा व्हिडीओ 2014 चा आहे. सध्याच्या परिस्थितीतही हा व्हिडीओ तंतोतंत जुळतो. मोठा संघर्ष आणि आयुष्य बदलणारा प्रवास तसाच आहे, या व्हिडीओला आतापर्यंत 3.5 मिलियन म्हणजे 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या मिनिटाचा हा व्हिडीओ पाहून लोक भावुक झाले आहेत. नेटकरी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Anand Mahindra shares emotional video on twitter about Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.