काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या विचित्र पदार्थांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते आणि या फोटोंमुळे लोकांना काय करावं हेच सुचत नव्हतं. कारण कुणीतरी दूध आणि मॅगी एकत्र खाल्ली होती, त्यानंतर गुलाबजाम आणि पाव खाल्ला होता. हे जे कुणी लोक आहेत ते काही थांबायचं नावच घेत नाहीयेत. आता सोशल मीडियात बेंगळुरूमधील एका अशा स्टॉलची चर्चा होत आहे जिथे आइस्क्रीम डोसा, आयस्क्रीम फ्राय, आइस्क्रीम चॉकलेट-इडली, बिस्कीट डोसा अशा भन्नाट डिश मिळतात.
या स्टॉलचा एक व्हिडीओ प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी याचं कौतुकही केलं आहे. पण लोक मात्र हे पदार्थ पाहून हैराण झाले आहेत. कारण त्यांनी कधी डोसा आणि इडलीची अशी कधी कल्पनाच केली नव्हती.
आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन लिहिले आहे की, 'आइस्क्रीम डोसाचा मी फॅन नाहीय. पण या माणसाला मी सलाम करतो'. त्यांच्या या ट्विटला ९ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि १ हजारांपेक्षा जास्त रि-ट्विट मिळाले आहेत. हा स्टॉल बेंगळुरूमध्ये असून इथे साउथ इंडियन फूड्स आइस्क्रीमसोबत दिले जातात. मंजूनाथ नावाची व्यक्ती हे पदार्थ तयार करते.