आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर नेहमीच एक्टीव्ह असतात. वेगवेगळ्या फोटोज आणि व्हिडीओच्या माध्यमातून कधी विनोदी तर कधी भावनीक संदेश ते देतात. सध्या आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्ही गोंधळून जाल कारण बराच कन्फूज करणारा हा फोटो आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर हा फोटो पाहून प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.
हा गोंधळून टाकणारा फोटो शेअर करत असताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन दिलं आहे की, मी या फोटोच्या ऑप्टिकल इल्यूजनमागे असणारं विज्ञान समजू शकत नाही. पण हे निश्चितच परिणामकारक आहे. जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून सुरूवात करून इतर ठिकाणी पोहोचता. विज्ञानापेक्षा नैतिकतेने पाहिल्यास या फोटोमागचं कारण लक्षता येईल. म्हणजेच ज्या नजरेने तुम्ही इतरांना पाहता ती नजर बदलायला हवी. या फोटोला आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ४०० पेक्षा जास्त लोकांनी फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. १३५ लोकांनी या फोटोला रिट्विट केलं आहे.
अलिकडेच त्यांनी जगातल्या सर्वात वेगवान धावत असलेल्या लहान मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा या मुलाचा स्पीड पाहून हैराण झाले आहेत. त्यांनी आशा व्यक्त केली की, अशी प्रतिभा भारतातही असेल. पण ती शोधण्याची गरज आहे. लोकांनी या ८ वर्षांच्या मुलाच्या व्हिडीओला चांगलीच पसंती दिली आहे. या मुलाचा स्पीड पाहून तर काही लोक म्हणाले की, हा तर हरणापेक्षाही वेगाने धावतो.
काय सांगता राव! अनोख्या तुरूंगाचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'हे तर आमच्या घरापेक्षा भारीये'....
आनंद महिंद्रा यांनी एका मुलाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'हा एखाद्या मशीनसारखा आहे. जेव्हा तो धावतो तेव्हा त्याचे पाय दिसणं बंद होतं. यात काहीच शंका नाही की, हा जगातला सर्वात वेगवान माणूस बनेल. पण आपल्या १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशातही अशी प्रतिभा लपलेली असली पाहिजे. अर्थातच कुणी तरी त्याच्या शोधाची वाट बघत असेल. तुमचे फोन सुरू ठेवा'. नादच खुळा! सुनेच्या इच्छेसाठी सासऱ्यानं थेट हेलिकॉप्टर मागवलं; पाठवणीसाठी अख्ख्या गावाची गर्दी