देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा जेव्हा सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ शेअर करतात तेव्हा त्या व्हिडीओची चर्चा तर होतेच. नुकताच त्यांनी जगातल्या सर्वात फास्ट लहान मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा या मुलाचा स्पीड पाहून हैराण झाले आहेत. त्यांनी आशा व्यक्त केली की, अशी प्रतिभा भारतातही असेल. पण ती शोधण्याची गरज आहे. लोकांना या ८ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ चांगलाच पसंत पडला. या मुलाचा स्पीड पाहून तर काही लोक म्हणाले की, हा तर हरणापेक्षाही वेगाने धावतो.
आनंद महिंद्रा यांनी एका मुलाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'हा एखाद्या मशीनसारखा आहे. जेव्हा तो धावतो तेव्हा त्याचे पाय दिसणं बंद होतं. यात काहीच शंका नाही की, हा जगातला सर्वात वेगवान माणूस बनेल. पण आपल्या १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशातही अशी प्रतिभा लपलेली असली पाहिजे. अर्थातच कुणी तरी त्याच्या शोधाची वाट बघत असेल. तुमचे फोन सुरू ठेवा'.
या मुलाचं नाव Rudolph Blaze Ingram असं आहे. याला जगातला सर्वात फास्ट मुलगा मानलं जातं. जर तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तर गुगलवर सर्च करून बघा. तुम्हाला याचं नाव आणि फोटो दिसतील.
Rudolph हा ८ वर्षांचा आहे. पण त्याचा स्पीड मोठ्यांनाही मागे सोडतो. २०१९ मध्ये या मुलाने ८.६९ सेकंदात ६० मीटर अंतर पार केलं होतं.
तर त्याने १३.४८ सेकंदात १०० मीटर रनिंग पूर्ण केली होती. तो जगातला सर्वान वेगवान धावपटू उसेन बोल्टपेक्षा केवळ ४ सेकंद मागे राहिला होता. बोल्टने वर्ल्ड एथलेटीक्स चॅम्पियनशिप २००९ मध्ये १०० मीटरची रेस ९.५८ सेकंदात पूर्ण केली होती.
Rudolph ला इन्स्टाग्रामवर ५ लाख ४७ हजार लोक फॉलो करतात. हे अकाउंट त्याचे वडील सांभाळतात. यावर तुम्ही त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटोज बघू शकता.