महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या मजेशीर आणि प्रेरणादायी पोस्ट्सची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. अशाच एका पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आनंद महिंद्रा यांच्या पत्नीने त्यांना चांगली झोप घेण्याचा खूप आधी एक चांगला सल्ला दिला होता, ज्याचा खुलासा त्यांनी आता स्वतः केला आहे.
युनायटेड नेशन्सचे माजी पर्यावरण कार्यकारी संचालक एरिक सोलहिम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केल्यावर हे सर्व सुरू झालं. ज्यामध्ये त्यांनी आनंद नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेलं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या प्रिस्क्रिप्शनवर झोप न लागण्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी संगणक आणि मोबाईल फेकून देण्याचा सल्ला दिला आहे.
आनंद महिंद्रा यांनी दिला रिप्लाय
आनंद महिंद्रा यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णाचं नाव आनंद असं लिहिलेले पाहिल्यावर त्यांनी हे ट्विट रिट्विट केले. ट्विट शेअर करताना त्यांनी सोलहिम यांना सांगितले की, “तुम्ही मला हे ट्विट करत आहात असं दिसतं. तसं माझ्या पत्नीने मला खूप पूर्वी हे करण्यास सांगितलं, जरी तिच्याकडे मेडिकल डिग्री नसली तरी. त्यांनी हे सर्व मजेशीर पद्धतीने लिहिलं आहे.
एका युजरने गंमतीत लिहिले की, “आता या ट्विटनंतर भारतीय बायका आपल्या पतीला टोमणे मारतील आणि ही पोस्ट पुरावा म्हणून वापरली जाईल. काही युजर्सनी गंमतीने कमेंट केली आहे की, "सर, कृपया आम्हाला तारीख आणि वेळ सांगा की तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेलं हे कधी लागू कराल आणि तुमचा संगणक आणि फोन फेकून द्याल. फेकलेल्या या वस्तू पकडण्यासाठी आम्ही तुमच्या बाल्कनीखाली ब्लँकेट घेऊन उभे राहू." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.