(Image Credit- New Indian Express)
माणसं पैश्याने नाही तर मनाने श्रीमंत असायला हवीत असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कोरोनाकाळात कर्तव्यावर हजर असलेल्या खाकी वर्दीतील देवमाणसांनी वेळोवेळी आपल्या मनाची श्रीमंती आणि सामाजिक जाणिव दाखवून दिली. सध्या सोशल मीडियावर अश्याच एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा फोटो व्हायरल होत आहे.आंध्रप्रदेशात वास्तव्यास असलेल्या या पोलिसाचे नाव के. के कृष्ण मुर्ती असं आहे. दर महिन्याच्या पगारातून १० हजार बाजूला काढून कृष्णमुर्ती हे गोरगरिब, गरजूंना अन्नाचे वाटप करतात.
२०१७ पासून हे काम सुरू आहे.
२०१७ पासून कृष्णमुर्ती समाजातील गरजूंना कपडे, लत्ते आणि रेशनचे सामान पुरवत आहेत. सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. म्हणून आता ते लोकांना गरम कपडे पुरवण्यासाठी काम करत आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मला माझ्या आजी- आजोबांकडून ही प्रेरणा मिळाली. कारण मी लहानपणी माझ्या आजी-आजोबांना गोरगरिबांची मदत करताना पाहिले आहे. पोलिस विभागात नोकरीसाठी रूजू झाल्यानंतर मी या चांगल्या कामाची सुरूवात केली.''
काय सांगता? आता हाय-फाय झाला बाबा का ढाबा; अन् काऊंटर सांभाळताहेत बाबा
के.के कृष्णमुर्ती याचा पगार ४५ हजार रूपये प्रती महिना आहे. त्यातून १० हजार रुपये बाजूला काढून ते गोरगरिबांना मदत करतात. गेल्या दोन महिन्यात त्यांनी आजूबाजूच्या गावातील लोकांना गरम कपडे आणि चादरी वाटण्याचे काम केले आहे. कृष्णमुर्ती यांच्या कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर कृष्णमुर्ती यांच्या कार्याने लोक प्रभावित झाले आहेत.