(Image Credit- New indian Express)
खाकी वर्दीच्या कर्तृवाच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. कोरोनाच्या महासंकटातही कर्तव्यावर हजर असताना कोणासाठी अन्नदाता तर कोणासाठी देवदूत बनून खाकी वर्दीने मदतीसाठी हात दिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहेत. एका ७० वर्षीय आजीला वाचवण्यासाठी पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे.
आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील गुदूर गावात बुधवारी ही घटना घडली. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार जवळपास रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ड्यूटीवर हजर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल शिव कुमार आणि श्याम यांना १०० क्रमांकावर एक फोन आला. यावेळी एक वृद्ध महिला विहिरीत पडल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांनी या विहिरीजवळ गर्दी केली होती. पण विहिरीच्या आत उतरून या वृद्ध महिलेला वाचवण्याचे धाडस कोणीही केलं नाही. अंधार आणि विहिर जास्त खोल असल्यामुळे स्थानिकांची हिंमत झाली नाही.
माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो
फोनला उत्तर दिल्यानंतर काहीवेळात कॉन्स्टेबल त्याठिकाणी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की वृद्ध महिला बी. सावित्री या कोणत्याही क्षणी विहिरीत बूडू शकतात. म्हणून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उडी मारण्याचं ठरवलं. शिव कुमार यांनी सांगितले की, ''वृद्ध आजीला वाचवायचं हेच माझ्या डोक्यात होतं. या आजीला वाचवण्यासाठी मी उचलून माझ्या अंगावर ठेवण्याचा प्रयत्न केला.'' स्थानिक लोक आणि पोलिस कॉन्स्टेबल शिव कुमार, सुंदर यांना दोरखंड शोधण्याासाठी जवळपास १० मिनिटांचा वेळ लागला. मग या दोन्ही पोलिसांनी मिळून आजींना सुखरूप बाहेर काढलं.
मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर या आजींंना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी स्थानिकांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. पण या आजींना नेण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आरएमपी यांना बोलावले. त्यांनी या आजींना योग्य उपचार दिले. स्थानिक लोक आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले. पोलिसाच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.