Social Viral : काही लोकांना जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ, फोटो काढणे आवडते. मात्र, याचे काही वेळा याचे गंभीर परिणाम ही होताना दिसतात, याचा प्रत्यय हा व्हायरल व्हिडीओ पाहून येतो.
सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हायरल होणारा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. गाडीतून उतरून चक्क हत्तीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पर्यटकांचा प्लॅन चांगलाच फसलाय. हत्तीसोबत सेल्फी घेणं या पर्यटकांना महागात पडलंय.
कर्नाटक येथील सीमेवरील बांदीपूर वनक्षेत्रात हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओनूसार, दोन पर्यटक जंगलात सेल्फी घेण्यासाठी कारमधून उतरले. हे पर्यटक सेल्फी घेत असताना या हत्तीची नजर त्यांच्यावर पडली. हल्ला करण्यासाठी हत्ती वेगाने त्यांच्याकडे आला .त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी जोरात पळायला सुरुवात केली असता त्यातील एकजण तोल जाऊन खाली पडला. हत्ती त्याच्या पाठीमागेच असतो. पण ती व्यक्ती कशीबशी स्वत ला सावरत उठते. काही वेळ पाठलाग केल्यानंतर हत्ती पुन्हा जंगलात जातो. त्यामुळे या दोघांचा जीव वाचला आहे. मात्र, यामुळे त्यांना आयुष्यभराचा धडा मिळाला.
व्हायरल व्हिडीओमुळे वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्रात निर्बंध लागू करण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. नेटकऱ्यांनी कारमधून जंगलात बाहेर पडल्यानंतर या दोघांचा खरपुस समाचार घेतला.