स्वतःला शेफ (Chef) म्हणवणाऱ्या एका व्यक्तीनं सफरचंदाच्या भजी (Apple Pakoda) बनवल्याचं पाहून भजीप्रेमींचा (Pakoda lovers angry) चांगलाच संताप झाला आहे. प्रत्येक पदार्थाचे काही निस्सिम चाहते असतात. आपल्या आवडत्या पदार्थावर त्यांचा इतका जीव जडलेला असतो की त्यात कुणी काही छेडछाड केली, तरी त्यांचं पित्त खवळतं.
ते पदार्थ जरी इतर देशांतील कुणी चुकीच्या पद्धतीनं बनवत असल्याचं दिसलं, तरी त्याला त्याची चूक दाखवून देण्यात ही मंडळी अग्रेसर असतात. आपल्या आवडत्या पदार्थाची मस्करी करणं, तो पदार्थ चुकीच्या पद्धतीनं तयार करणं किंवा त्या पदार्थाबाबत गैरसमज पसरवणं यातील काहीही ते सहन करू करत नाहीत. जगभरातील भजीप्रेमींचा असाच संताप सध्या झाला आहे आणि त्याला कारण ठरलंय इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ.
या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क सफरचंदाची भजी बनवत असल्याचं दिसत आहे. अगोदर ही व्यक्ती डाळीचं पीठ घेते. त्यात पाणी घालून पीठ भिजवते. मग एक सफरचंद घेते. त्याचे बारीक बारीक काप करून ते त्यात टाकते. त्यानंतर काही वेळाने फ्राय केलेल्या सफरचंदाच्या भजी तो बाहेर काढतो आणि त्याची चव पाहतो. त्याच्या रिऍक्शनवरून त्या भजी फारच चविष्ट झाल्या असाव्यात, असं वाटतं.
भजीबाबतची मतंभजी हा मुळात तिखट वर्गात मोडणारा कुरकुरीत पदार्थ आहे. त्यामुळे तिखटाला मिळत्याजुळत्या चवीच्या गोष्टी भजी करण्यासाठी वापरण्यात येतात. त्यात विविध भाज्यांचा समावेश असतो. अनेकदा कांदा आणि मिरची या दोन पदार्थांपासूनच भजी तयार केल्या जातात. मात्र काहीजण प्रयोग म्हणून त्यात पालक, कोथिंबीर आणि इतर काही भाज्यांपासूनही भजी तयार करतात आणि त्या चवीला उत्तम लागतात. मात्र भजी जर कुणी गोड करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची मूळ जातकुळीच बदलत असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.