असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. जे अनेकदा सिद्धही झालं आहे. अनेकदा अशा घटना समोर येतात ज्यातून ही बाब स्पष्ट होते. पण खरंच असं आहे का? अमेरिकेच्या एरिझोनामधील एका महिलेने काही वर्षाआधी असं काही केलं जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्हीच ठरवा तिने चुकीचं केलं की योग्य. या महिलेने आपल्या प्रियकराला 1,59,000 मॅसेज पाठवले. ज्यामुळे तिला तुरूंगवास झाला.
डेली मेल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 2018 मध्ये जॅकलीन एडीजला अटक करण्यात आली होती. त्यावेळी महिला 31 वर्षांची होती. तिने एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका डेटसाठी विचारलं. दोघांचं बोलणं सुरू झालं. तेव्हा त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डेटवरच ही महिला त्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. ती घरी पोहोचल्यावर तिने त्याला मेसेज करणं सुरू केलं.
10 महिन्यात दीड लाख मेसेज
2017 मध्ये जेव्हा पहिल्या दिवशी तिने 500 मेसेज पाठवले तेव्हा त्या व्यक्तीला वाटलं की, तो तिच्यासोबत जास्त काळ राहू शकणार नाही. महिलेने त्याला दर दिवसाला भरपूर मेसेज पाठवले. केवळ 10 महिन्यात तिने त्याला दीड लाख मेसेज पाठवले होते. यादरम्यान या व्यक्तीने पोलिसात महिलेची तक्रार दिली. ती त्याला मेसेजमध्ये जीवे मारण्याची धमकीही देत होती. ज्यामुळे व्यक्ती घाबरला होता. त्याने तिला ब्लॉक केलं. महिला त्याला म्हणाली होती की, त्याने तिला ब्लॉक केलं तर ती त्याचा जीव घेईल.
महिला ने एरिजोना फ्लोरिडामध्ये शिफ्ट झाली आणि त्या व्यक्तीच्या घराजवळ राहू लागली. एप्रिल 2018 ला पोलिसांनी महिलांना अटक केली. कारण ती त्याच्या घराच्या खिडकीतून आत शिरली आणि त्याच्या बाथरूममध्ये बाथटबमध्ये आंघोळ करत होती. पोलिसांना खाली उभ्या असलेल्या कारमध्ये एक चाकूही सापडला. पोलिसांनी तिला मेसेज पाठवले म्हणून नाही तर ती त्याच्या घरात घुसली म्हणून अटक केली.
पोलिसांनी अटक केल्यावर जेव्हा तिला मीडियाने विचारलं की, तू फार मोठा काही गुन्हा केला नाही. तेव्हा त्यावर ती म्हणाली की, प्रेमात जास्तच करावं लागतं. हळूहळू लोकांना समजलं की, महिला वेडी आहे. तिला काहीतरी मानसिक समस्या आहे. 2020 मध्ये तिच्यावरील सगळे चार्ज हटवण्यात आले आणि तिला चिकित्सेसाठी पाठवण्यात आलं. याच महिन्यात महिला पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली. आता कुठे लोक दावा करत आहेत की, नोव्हेंबर 2021 मध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे.