नवी दिल्ली ।
सध्याचं युग आपण विज्ञानाचं युग असल्याचं म्हणतो पण या युगात देखील अंधश्रद्धा अजूनही ठराविक लोकांच्या मनात एवढी भिनली आहे की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी लोक नाना प्रकारचे धोकादायक मार्ग अवलंबत असतात, यामध्ये जादूटोणा अशा काही घातक उपायांचा समावेश असतो. इंडोनेशियात राहणाऱ्या एका व्यक्तीनं शारिरीक शक्ती वाढविण्याच्या मोहापायी चक्क ४२ तरुणींची आणि काही महिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
'डेली स्टार'नं दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीनं अंधश्रद्धेपायी अनेक महिलांचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे इंडोनेशियातील या व्यक्तीनं तब्बल ४२ जणांची हत्या केली. चौदा वर्षांपूर्वी १० जून २००८ रोजी या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा आरोपीनं गुन्हा कबूल करत १९८६ ते १९९७ दरम्यान आपण ४२ मुलींची आणि काही महिलाचीं हत्या केल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यानं ११ अल्पवयीन मुलींचा देखील जीव घेतला आहे.
धक्कादायक कारण आलं समोर दरम्यान, या व्यक्तीला तब्बल ७० मुलींची हत्या करायची होती असं त्यानं सांगितलं. या घृणास्पद कृत्यामागे अंधश्रद्धा हे प्रमुख कारण होतं. तरूण मुलींची आणि महिलांची थुंकी प्यायल्यानं सुपर पॉवर मिळते असा व्यक्तीचा समज होता. यासाठीच त्याला ७० महिलांची हत्या करायची होती. तसेच ७० महिलांची थुंकी प्यायल्यानं तो खूप शक्तीशाली होणार अशी त्याची अंधश्रद्धा होती. आरोपीच्या वडिलांच्या भुतानं त्याला असं करायला सांगितल्यांचं त्यानं म्हटलं आहे. आपल्या वडिलांच्या आत्म्याचं म्हणणं ऐकून त्यानं ७० महिलांची हत्या करण्याचं ठरवलं.
महिलांची थुंकी पिण्यासाठी वडिलांच्या आत्म्याने महिलांची हत्या करण्यास सांगितले नव्हते, मात्र असं करायला अनेक वर्षे लागतील म्हणून व्यक्तीने हा मार्ग अवलंबला. तेव्हापासून त्याने महिलांची हत्या करण्यास सुरूवात केली. जेव्हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं तोवर त्यानं ४२ महिलांचा जीव घेतला होता. आरोपी शेळ्या-मेंढ्यांना चरायला घेऊन जाण्याचं काम करत असे. त्याच्या घराच्या जवळील ऊसाच्या शेतात त्यानं अनेक मृतदेह पुरले होते.