सोशल मीडियावर एका विमानाचा टायर निखळून खाली पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील आहे. अमेरिकेतील युनायटेड एअरलाइन्सचे विमान सॅन फ्रान्सिस्कोहून उड्डा घेतल्यानंतर जपानकसाठी निघाले होते. या विमानात २३५ प्रवासी आणि १४ क्रू मेंबर्स होते. मात्र, विमानाचे लॉस एंजेलिसमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेकऑफनंतर विमान थोड्या अंतरावर आकाशात गेल्यानंतर त्याचे चाक बंद झाले. विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गिअरवरील सहा टायरपैकी एक टायर तुटून जमिनीवर पडला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात विमानाचा टायर फुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
पुन्हा Indigo; विमानाच्या सीटवरुन कुशन गायब, प्रवाशाने फोटो शेअर करताच कंपनीचे स्पष्टीकरण
या घटनेत एकही प्रवासी जखमी झालेला नाही. मात्र, सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या पार्किंगमध्ये टायर फुटला. या ठिकाणी एका कारच्या मागच्या खिडकी धडकला. तेथे लावलेले कुंपणही तोडून टायर दुसऱ्या ठिकाणी गेले. कारचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर लगेचच बोईंग ७७७ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. याबाबत कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, एअरलाइनने म्हटले आहे की, २००२ मध्ये तयार केलेले विमान फ्लॅट टायरशिवाय सुरक्षितपणे उतरण्यासाठी डिझाइन केले होते, प्रवाशांना दुसऱ्या विमानात हलवले आहे.