Motivational Story । नवी दिल्ली : जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संकटांचा डोंगर तुटून पडतो तेव्हा अनेक जण खचून जातात. अनेकांना जीवनाचा कंटाळा येतो, मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील तरूणाने अशा लोकांना प्रेरणा दिली आहे. आयुष्यात हार न मानायला शिकवणारी ही व्हिडीओ आता चर्चेचा विषय बनली आहे. फरिदाबादच्या रस्त्यांवर मोटारसायकलवरून इडली सांबर विकणाऱ्या अविनाशची स्टोरी लोकांना भावूक करत आहे. ज्या लोकांनी अविनाशचे हे कष्ट जाणून घेतले ते सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
कंपन्यांमध्येही केले आहे काम अविनाशची ही प्रेरणादायी स्टोरी swagsedoctorofficial या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितले की, फरिदाबादमध्ये रस्त्याच्या कडेला स्वादिष्ट इडली सांबर विकणाऱ्या अविनाशला भेटा. तो पेशाने बी. कॉम उत्तीर्ण आहे, त्याने अनेक राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये टीम मेंबर म्हणून काम केले आहे. तसेच त्याने मॅकडोनाल्डमध्येही सेवा दिली आहे. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो मोठ्या मेहनतीने इडली विकण्याचा व्यवसाय करतो. अविनाशच्या स्टॉलला भेट देऊन त्याची मदत करा.
अविनाशने व्हिडीओमध्ये सांगितले की, त्याने 2019 मध्ये बी.कॉम ऑनर्सचे शिक्षण पूर्ण केले होते, ज्याच्यानंतर 3 वर्षांपर्यंत मॅकडोनाल्डमध्ये काम केले. तिथूनच त्याला फूड बिझनेसची कल्पना सुचली. पण कधी मोटारसायकलवरून इडली सांबर विकायला सुरुवात करेल असे त्याला वाटले नव्हते. मागील 3 महिन्यांपासून त्याच्याकडे कोणतीही नोकरी किंवा जास्त पैसे कमावण्याचे साधन नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने मोटारसायकलवरून इडली सांबर विकण्यास सुरुवात केली.
सांभाळतोय कुटुंबाची जबाबदारीज्या मोटारसायकलवर तो स्टॉल उभारून इ़डली सांबर विकतो, ती मोटारसायकल त्याच्या वडिलांनी त्याला बारावी उत्तीर्ण झाल्यावर दिली होती. खरं तर अविनाशच्या वडिलांचा मागील वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अविनाशवर पडली. त्याची पत्नी दक्षिण भारतीय असून ती चांगले दक्षिण भारतीय पदार्थ बनवण्यात माहिर असल्याचे तो सांगतो. त्यामुळे त्याने इडली सांबर विकायला सुरुवात केली. त्यांना दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. अविनाशसोबत त्याची आई आणि लहान भावंडेही राहतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"