कोरोनाची माहामारी आल्यापासून संपूर्ण जीवनशैली बदलली आहे. संकटकाळात स्वतःला कसं आनंदी राहता येईल तसंच इतरांनीही कशातून आनंदी राहण्याची प्रेरणा मिळेल. याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांना खूश करण्याासाठी डॉक्टरांनीच ठेका धरला आहे. डॉ. सईद फैजान अहमद यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, माझे कोविड ड्यूटी कलिग डॉ. अरूप सेनापती यांना भेटा. हे सिल्चर मेडिकल कॉलेज आसाम येथे ईएनटी सर्जन आहेत. कोरोना रुग्णांना आनंद मिळवून देण्यासाठी ते डान्स करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टरांनी पीपीई कीट घालून ऋतिकच्या 'घुंगरू तूट गये'.... या गाण्यावर ठेका धरला आहे. Video: शिकारीसाठी बिबट्या थेट झाडावर चढला; माकडानं असं डोकं लावून जीव वाचवला
आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हिडीओला लाईक केलं असून ४ हजार ७०० लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, ऋतिक रोशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत आपणही या डान्सची स्टेप शिकणार असल्याचे म्हटले आहे. तसंच या डॉक्टरच्या उत्साहाचे कौतुकही केलं आहे. याआधीही कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्या एका महिला डॉक्टरने रुग्णालयात डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल