आसामसहीत काही ठिकाणी बुधवारी सकाळी भूकंपाचे ( Assam Earthquake) धक्के बसले. अनेक ठिकाणी भीतींना भेगा पडल्या आणि बराच वेळ लोक घराबाहेर उभे होते. अशात आसाम सरकारने एक हेल्पलाइनही जारी केली आहे. ज्यावर भूकंपात झालेल्या नुकसानाची माहिती दिली जाऊ शकते. सध्या नुकसानाची माहिती घेतली जात आहे आणि मदतही केली जात आहे.
बुधवारी सकाळी आसामसहीत पूर्वोत्तरात भूकंपाचे (Earthquake) काही झटके बसले. सर्वात मोठ्या धक्क्याची तीव्रता ६.४ रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र आसामच्या सोनितपूरमध्ये होतं. भूकंपामुळे गुवाहाटी (Guwahati) शहरातील अनेक इमारतींमध्ये भेगा पडल्या आहेत. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, भूकंपामुळे घरावरील पाण्याची टाकी फुटली आणि ते पाणी सीलिंगद्वारे रूममध्ये आलं. हे चित्र एखाद्या पुराच्या चित्रासारखंच वाटतं. हा व्हिडीओ गुवाहाटीतील एक इमारतीचा आहे. सुदैवाने यात कुणाला काही इजा झाली नाही.
आसाममद्ये सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचा पहिला झटका बसला होता. ज्याची तीव्रता ६.४ रिक्टर स्केल इतकी होती. त्यानंतर साधारण अडीच तासादरम्यान ६ आफ्टरशॉट्स जाणवले गेले. त्यांची तीव्रता ३.२ ते ४.७ होती. आफ्टरशॉट्सनंतर लोक घाबरलेले होते. साधारण चार ते पाच तास लोक घाबरलेले होते आणि घराबाहेर थांबले होते.