शहराच्या ठिकाणी जरी मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा असला तरीसुद्धा आजही ग्रामीण भागात असे अनेक भाग त्या ठिकाणी घरातील लोकांना पाण्यासाठी ४-५ दिवस वाट पाहावी लागते. नळाला जेव्हा पाणी तेव्हा त्या घरातील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावर एका महिलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हाला पाण्याची खरी किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. शहरात काहीही न करता आयतं नळाला पाणी येतं. पण गावच्या ठिकाणी मात्र मैलन् मैल पाणी आणण्यासाठी जावं लागतं.
हा व्हिडीओ आसाममधील आहे. या महिलेच्या घरी जेंव्हा नळातून पाणी आलं तेंव्हा तिला क्षणभर हे स्वप्नच आहे असं वाटलं. कारण आजपर्यंत आयुष्यात ‘हा’ दिवस पाहयला मिळेल याची याची तिला कल्पनाही नव्हती. त्यांनी लगेच नळासमोर दोन्ही हात आणि डोकं झुकवून नमस्कार केला. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी केलेली तपस्या पूर्ण झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. पाण्यासाठी काय काय करावं लागलं आणि मग नळाला पाणी आलं याचा आनंद या महिलेच्या चेहऱ्यावर दिसून आला होता. माणुसकीला काळीमा! मुक्या जीवाला कारच्या मागे बांधून संपूर्ण शहरभर फरपटत नेलं
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘आसाममधील या भगिनी, आपल्या घरात नळाच्या माध्यमातून आलेल्या पाण्याचं स्वागत त्याचं वंदन करुन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘जल जीवन मिशन’च्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष मुलभूत गोष्टींचा त्रास सहन करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातही बदल होत आहे. हेच या व्हिडीओतून स्पष्ट होते.’ असं शेखावत यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ना डाएट, ना व्यायाम! १०० वर्षांच्या मॉर्डन आजींना दिला दीर्घायुष्याचा मंत्र, वाचा हे सिक्रेट