अंतराळ प्रवासी विक्टर ग्लोवरने ट्विटरवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अंतराळातून काढण्यात आला आहे. या व्हिडीओने सोशल मीडिया युजर्सची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा अवाक् व्हाल. ग्लोवर स्पेसएक्स क्रू ड्रॅगन आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे निवासी आहेत. त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, अंतराळातील माझा पहिला व्हिडीओ. ड्रॅगन रेजिलिएंसच्या खिडकीतून पृथ्वीचा व्हिडीओ रोकॉर्ड केला आहे.
आतापर्यंत हा व्हिडीयो १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने केलेल्या कमेंटनुसार हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे. अनेक युजर्सनी ग्लोवर यांना या व्हिडीओबद्दल धन्यवाद म्हटलं आहे. हा अनुभव सगळ्यांशी शेअर करायला हवा .'मी केवळ कल्पना करू शकतो की अंतराळातून खाली पाहण्याचा अनुभव कसा असतो.' असंही त्यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत या व्हिडीओला ९९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ ३० सेंकदांचा असून एक वेगळा अनुभव या व्हिडीओच्या माध्यमातून मिळाला आहे.
याआधीही नासाकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. नासातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीपासून सुमारे 7 कोटी प्रकाश वर्ष लांब असलेल्या SN 2018gv सुपरनोव्हामध्ये हा स्फोट झाला होता. याआधी असा कोणताही व्हिडीओ पाहिला गेला नव्हता. एखाद्या ताऱ्याचा भीषण स्फोट झाल्यास त्याला पार्नोव्हा असं म्हणतात. आता सुपरनोव्हा NGC 2525 गॅलेक्सीमध्ये दिसली. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की अशाच एका स्फोटानंतर पृथ्वीचा जन्म झाला होता. त्रिवार सलाम! महामारीमुळे कोरोना योद्धांची होतेय दयनीय अवस्था; ८ महिन्यांनी बदलला नर्सचा चेहरा
नासाच्या म्हणण्यानुसार सुपरनोव्हा SN 2018gvचा शोध प्रथम जपानमधील हौशी खगोलशास्त्रज्ञ कोची इटागाकी यांनी 2018 मध्ये शोधला होता. इटागाकीने नासाला त्यांच्या शोधाबद्दल सांगितले होते. त्यानंतर अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने हब्बल दुर्बिणीच्या मदतीने या सुपरनोव्हाचे परीक्षण करण्यास सुरवात केली. सुपरनोव्हाचे परीक्षण करण्यासाठी नासाने स्लो-मोशन व्हिडीओ पोस्ट केला होता. अभिमानास्पद! बीएमसीच्या शाळेतली अन् चाळीतल्या घरात वाढलेली सुवर्णा; आता ‘नासा’ची कर्मचारी