हे सर्वांनाच माहीत आहे की, पृथ्वी स्वत:भोवती फिरते. स्वत:भोवती एक प्रदशिणा घालायला पृथ्वीला २४ तासांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्र असा निर्सगाचा अद्भूत खेळ बघायला मिळतो. पण पृथ्वीचं हे गोल फिरणं आपल्याला जाणवत नाही. पण आता हा अद्भूत नजारा बघायला मिळणार आहे. सिनेनिर्माता अतुल कसबेकर यांनी एक शानदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या हे लक्षात येईल की, भलेही आपल्याला काही जाणवत नाही, पण पृथ्वी स्वत:भोवती फिरते. पृथ्वी स्वत:भोवती फिरते पण आपल्याला ते जाणवत नाही कारण पृथ्वी समान गतिने फिरते.
हा व्हिडीओ कसबेकर यांनी ८ जानेवारीला ट्विटरवर शेअर केला. असा नजारा बघून लोक खूश झाले आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ६३ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिले असून ६ हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अतुल एक निर्माता असण्यासोबतच फोटोग्राफर सुद्धा आहेत.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'एका अॅस्ट्रोग्राफरने हा सुंदर व्हिडीओ शूट केलाय. हा नजारा त्याने Tracking Mount च्या मदतीने कॅप्चर केलाय. यात त्यांनी Tracking Mount ध्रुव ताऱ्याकडे ठेवला. याने पुढील तीन तासांपर्यंत प्रत्येक १२ सेकंदात फोटो क्लिक केले'.