कचऱ्याची योग्य जागा ही कचराकुंडी आहे. मात्र, तरीही अनेकदा कचरा रस्त्यावरच टाकला जातो. वाहनातून जाताना असुद्या की चालताना बरेचजण कचरा वाटेतच फेकतात आणि पुढे निघून जातात. शहरांमध्ये जागोजागी कचराकुंड्या असतात. परंतू हायवेवर तेवढ्य नसतात. यामुळे काच खाली करून कचरा फेकला जातो. असे कृत्य करणे एका तरुणाला महागात पडले आहे.
हा प्रकार दुसरीकडचा नसून कर्नाटकमधला आहे. आणि अशाप्रकारे कचरा रस्त्यावर टाकताना तुम्हाला एकदा दोनदा नाही तर दहादा विचार करावा लागणार आहे. या तरुणांसोबत जे झाले ते तुमच्याबाबतीतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंगळुरू मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार दोन तरुणांना या एका चुकीसाठी मदीकेरीहून कोडगू असे 80 किमी लांब परत यावे लागले आहे. हायवेवर फेकलेला कचरा साफ करण्यासाठी त्यांना यावे लागले.
कोडगू टुरिझम असोसिएशनचे सचिव Madetira Thimmaiah त्यांच्या घरी जात होते. यावेळी त्यांची नजर रस्त्यावर पडलेल्या दोन पिझ्झा बॉक्सवर पडली. गाडीवरून उतरून त्यांनी बॉक्स उघडून पाहिला आणि त्यात त्यांना एक बिल सापडले. या बिलावर पिझ्झा खाणाऱ्यांचा फोन नंबर होता. त्यांनी या नंबरवर फोन केला आणि त्यांना मागे येऊन कचरा साफ करण्यास सांगितले. मात्र, त्या तरुणांनी माफी मागत आता 80 किमी लांब आलोय, माघारी येऊ शकत नाही असे सांगितले . यानंतर जे झाले ते खरेच धक्का देणारे होते.
नियम तर मोडण्यासाठीच असतात
नियम हे तर तोडण्यासाठीच असतात हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल. पण असाच एक हटके प्रकार समोर आला आहे. निष्काळजीपणामुळे एका दुचाकीस्वाराला चांगलाच फटका बसला आहे. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून सोशल मीडियावर ही घटना चांगलीच व्हायरल झाली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने एका दुचाकीस्वाराला त्याच्या बाईकच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड मोजावा लागला आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बंगळुरूमध्ये घडली होती. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. जेव्हा पोलिसांनी त्याला स्कूटरच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड वसूल करत चालान कापलं. वाहतुकीचे अनेक नियम मोडल्यामुळे हा दंड आकारण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरूण कुमारने तब्बल 77 वेळा वाहतुकीचे नियम तोडले आहेत. म्हणून दंडाची रक्कम ही खूप जास्त आकारण्यात आली. पोलिसांनी आता अरूणची दुचाकी ताब्यात घेतली आहे.
यानंतर थिमय्या यांनी त्या तरुणाचा नंबर पोलीस आणि सोशल मीडियावर शेअर केला. मग काय तरुणांना एवढे फोन गेले की ते हैराण झाले. अखेर त्यांना 80 किमी मागे यावेच लागले.