निसर्गात असे अनेक आश्चर्य आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकल्यावर आपल्याला विश्वास बसत नाही. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात ३ सांपाची डोकी दिसत आहेत मात्र, हे साप नसून निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे, हे साप नाहीत तर आहे तरी काय? हेच आपण आज पाहाणार आहोत. या फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, आणि लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे.
फोटोत दिसणारा हा 3 तोंडाचा साप नसून, जगातील सर्वात मोठं फूलपाखरु आहे. कदाचित हे ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसला नसेल, पण हे खरं आहे. एटाकस एटलस (Attacus Atlas) नावाचं हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात सुंदर फूलपाखरु आहे. हे फुलपाखरु फक्त २ आठवडे जगतं. फुलपाखरु मादा अंडी घालते आणि त्यानंतर ते मरतं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत हे निसर्गात असे काही रंग उधळतं, की पाहणारे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही.
या फूलपाखराच्या दोन्ही पंखाच्या टोकांना सापाच्या तोंडासारखे आकार असतात. शिवाय त्याचं डोकंही साप असल्याचाच भास देतं. या फूलपाखराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. जेव्हा या फूलपाखराला कुणापासूनही धोका वाटतो, तेव्हा तो पंख फडफडवतो, आणि साप असल्याचा भास निर्माण करतो, त्यामुळे समोरचा शिकारी घाबरतो, आणि तिथून निघून जातो. हे फूलपाखरु थायलंडच्या जंगलात सापडतं.
सोशल मीडियात सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काहींना खरंच हा ३ तोंडांचा साप वाटतो आहे. तर ज्यांना हे कळतं आहे की हे फूलपाखरु आहे, त्यांचा यावर विश्वास बसत नाहीये.