युद्धाचा फायदा घेऊन हजारो पुरुषांकडून फसविण्याचा प्रयत्न; सौंदर्यवतीने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 02:06 PM2022-07-07T14:06:08+5:302022-07-07T14:09:06+5:30

लुईसाच्या म्हणण्यानुसार जगभरातील अनेक देशातील हजारो पुरूषांनी तिला युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली आमच्यासोबत राहण्याची ऑफर दिली आहे.

Attempting to deceive thousands of men by taking advantage of the war; Apabiti said beautifully | युद्धाचा फायदा घेऊन हजारो पुरुषांकडून फसविण्याचा प्रयत्न; सौंदर्यवतीने सांगितली आपबीती

युद्धाचा फायदा घेऊन हजारो पुरुषांकडून फसविण्याचा प्रयत्न; सौंदर्यवतीने सांगितली आपबीती

Next

नवी दिल्ली: मागील मोठ्या कालावधीपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. अद्यापही हजारो लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यादरम्यान युक्रेनमधील एका महिलेने दावा केला आहे की, युद्धामुळे जगभरातील हजारो पुरूष तिला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. 'द सन'च्या वृत्तानुसार, इंस्टाग्रामवर २.६ मिलियन्स फॉलोवर्स असणारी युक्रेनमधील एक बहुचर्चित महिला लुईसा खोवांस्की हिने दावा केला आहे की, तिचे सौंदर्य पाहून जगभरातील हजारो पुरूष तिला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

लुईसा युक्रेनची राजधानी किव या शहरात राहते. तिने केलेल्या दाव्यानुसार, जगभरातील अनेक देशातील हजारो पुरूषांनी तिला युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली आमच्यासोबत राहण्याची ऑफर दिली आहे. मात्र ती या सगळ्यामुळे दुखावली आहे. कारण सर्व पुरूष युद्धाच्या नावाखाली तिला फसवत आहेत. ती म्हणते की, सर्व पुरूषांना तिच्या सौदर्यांचे वेड आहे. युक्रेन सोडण्यासाठी तिला हजारो लोकांचे प्रस्ताव आले आहेत, असा दावाही करण्यात आला आहे. 

लुईसाच्या सौंदर्यावर हजारो लोक फिदा

लुईसा म्हणते की, युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर हजारो पुरूषांनी तिला सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच लोक तिच्या जवळ येण्याचा बहाणा करत असल्याचे सांगितले जात आहे. माझ्या सर्व चाहत्यांना कल्पना आहे की ही मंडळी माझी एवढी का काळजी करतात. तसेच काही लोकांनी तर आमच्या घरात येऊन राहण्याची ऑफर दिली असल्याचे लुईसा सांगते. लुईसा म्हणते की, माझे सौंदर्य अनेक देशांतील पुरूषांना आकर्षित करते. अनेकांनी रशिया-युक्रेनच्या युद्धाला संधीच्या स्वरूपात पाहिले आहे. 

दरम्यान, जगभरातील अनेक पुरूष युक्रेन सोडण्यासाठी तिच्यासोबत लग्न करण्यासही तयार आहेत. याशिवाय अनेक लोकांनी तिच्या राहण्याची व्यवस्था आपल्या घरात केली आहे, अशी माहिती लुईसाने दिली. मात्र लुईसाला कोणाचाच प्रस्ताव मंजूर नाही. ती म्हणाली, युद्धजन्य परिस्थितीत युक्रेनमध्ये राहण्याचा या लोकांचा प्रस्ताव स्वीकारणे अधिक धोकादायक आहे. युद्धाच्या काळातही मी युक्रेनमध्येच राहणार आहे. तिने या सर्व ऑफर्स नाकारल्या आहेत.

Web Title: Attempting to deceive thousands of men by taking advantage of the war; Apabiti said beautifully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.