नोकरीसाठी प्रत्येकजण किती मेहनत घेतो हे माहित आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात नोकरी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. त्याचसोबत नोकरी टिकवणंही प्रत्येकासाठी मोठं चॅलेंज असतं. ऑस्ट्रेलियातील ५१ वर्षीय हॅमिश ग्रिफिन नोकरी मिळाल्यानंतर तब्बल ३ हजार किमी दूर पत्नी आणि मुलांसह तस्मानियाला पोहचला. परंतु याठिकाणी ऑफिसला गेल्यावर अवघ्या २ तासांत त्याला नोकरीवरुन काढून टाकलं. काही क्षणात ग्रिफिन बेघर झाला. ग्रिफिनला जॉबवरुन काढण्याचं कारण अजब होतं. ते ऐकून तुम्हालाही शॉक्ड बसेल.
सोशल मीडियावर हॅमिश ग्रिफिन यानं पोस्ट लिहून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला आहे. व्हिडीओ मुलाखतीनंतर नोकरीसाठी हॅमिश Oueensland ते तस्मानियाच्या Strahan येथे पोहचले. याठिकाणी Big4 Holiday Park मध्ये त्यांनी नोकरी ज्वाईन केली. परंतु एम्प्लॉयरनं केवळ २ तासांतच त्यांना नोकरीवरुन काढून टाकलं. त्यावेळी हॅमिशला नेमकं काय झालं तेच कळालं नाही. त्यामुळे नोकरी काढण्याचं कारण विचारताच उत्तर ऐकून त्याला धक्का बसला. शरिराने जाड असल्याने हॅमिशला नोकरीवरुन काढण्यात आले.
डेली मेल रिपोर्टनुसार, हॅमिश ग्रिफिन यांना नोकरीवर ज्वाईन झाल्यानंतर एक सोफा बाजूला काढण्यास सांगितले. ज्यात त्यांना ते अवघड गेले. त्यानंतर शारिरीक दृष्ट्या कमकुवत असल्याने हॅमिशला नोकरीवरुन काढून टाकत असल्याचं कंपनीनं कळवलं. जाड असल्याने लॉनमध्ये गवत कापणे आणि सिढीवर चढण्याचीही कामे करु शकणार नाहीत असं कंपनीनं म्हटलं. नोकरीला लागताना ग्रिफिननं त्यांचे मेडिकल प्रमाणपत्रही देणे लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु मी माझं काम योग्य करतो, या कामाचा ८ वर्षाचा अनुभव आहे. परंतु कंपनीनं काहीच ऐकलं नाही असं ते म्हणाले.
ग्रिफिन म्हणाले की, ही नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. अनेक गोष्टींमध्ये बदल करत त्यांनी तस्मानिया गाठलं होतं. परंतु नोकरी गेल्यानंतर आता ना त्यांच्याकडे घर आहे ना कोणतं काम. ग्रिफिन एका क्षणात बेघर झाले आहेत. परंतु मी हार मानली नाही आता या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार असल्याचं त्यांनी सांगितले. ग्रिफिन यांच्या वकिलांचा दावा आहे की, कुठल्याही पुराव्याशिवाय मेडिकल कारणावरुन नोकरीवरुन काढणं म्हणजे भेदभाव करण्यासारखं असू शकतं.
९० किलो वजन कमी केले
विशेष म्हणजे, ग्रिफिननं गेल्या ८ वर्षात ९० किलो वजन कमी केले आहे. तरीही त्यांच्या नव्या कंपनीला ते जाडे वाटले आणि त्या कारणासाठी कंपनीने त्यांना नोकरीवरुन काढले. ९० किलो वजन कमी करण्यासाठी ग्रिफिन यांना सर्जरी, आहार, व्यायाम याचा आधार घ्यावा लागला. यामागे त्यांची पत्नी आणि मुलगा यांचं खूप महत्त्वाचं योगदान होते.