सापाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. त्यात सर्पमित्र कशाप्रकारे हुशारीने साप पकडतात हे बघायला मिळतं. पण सध्या एका महिलेचा आणि सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही ऑस्ट्रेलियन महिला पत्रकार असून सापाबाबत एका रिपोर्टचं शूटिंग करत होती.
साप रिपोर्टर महिलेच्या खांद्यावर होता आणि पुन्हा पुन्हा तिच्या हातातील माइकवर हल्ला करत होता. रिपोर्टर सारा कॉतेने सांगितले की, शूटिंगदरम्यान ती फारच घाबरली होती. कारण साप पुन्हा पुन्हा माइकवर फणा मारत होता. त्याचा डंख हातावरही बसू शकला असता, पण सुदैवाने तसे झाले नाही.
झालं असं की, चॅनल ९ ची रिपोर्टर सारा सापांच्या सेफ्टीवर एक पॅकेज करत होती. त्यासाठी काही सीन शूट करण्यासाठी ती गेली होती. शूट करताना अचानक साप तिच्या खांद्यावर चढला आणि तिच्या हातातील माइकवर हल्ला करू लागला. अर्थातच ती घाबरली होती.
ती या व्हिडीओत सांगत आहे की, 'साप सगळ्यांसोबत सहज नसतात. अनेक असंही होतं की, साप माणसांपेक्षा जास्त घाबरलेले असतात'. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियात आता व्हायरल झाला आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत.
सारा म्हणाली की, 'मी तिथे एकटी नव्हती. माझा कॅमेरामन होता आणि सर्पमित्रही होते. ते सापाला पुन्हा पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कुठे मी माझं शूट पूर्ण करू शकले. माझं शूट झाल्यावर सर्वातआधी मी सापाला खांद्यावरून काढलं.