जगभरात मुल न होण्याच्या अनेकांना समस्या आहेत. यावर आता आयव्हीएफ तंत्रज्ञान हा एक पर्याय आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मुल जन्माला घालू शकतात. पण, ऑस्ट्रेलियामध्ये या संदर्भात एक मोठा गोंधळ समोर आला आहे. या तंत्रज्ञानात स्पर्म डोनेट करुन मुल जन्माला घातली जातात.
जगभरात अनेकजण आपले स्पर्म विकतात. बॉलिवूडमध्ये या विषयावर एक चित्रपटही आला आहे, 'विकी डोनर' तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात एक व्यक्ती आपले स्पर्म विकतो. त्या बदल्यात तो पैसे घेतो. जगात अनेक लोक हे काम करत आहेत. या संदर्भात आता ऑस्ट्रेलियात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६० मुल एकसारखीच दिसत असल्याचे प्रकरण समोर आले. यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एका पार्टीत ही सर्व मुल एकत्र आले होते यावेळी हा प्रकार समोर आला. हा प्रकार समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
स्पर्म दात्याने LGBTQ+ समुदायातील अनेक सदस्यांना स्पर्म दान केले होते. सहसा हे शक्य नसते आणि नियमानुसार एका वेळी फक्त एका दात्याचे स्पर्म वापरावे असा नियम आहे. पण त्याने चार वेगवेगळी नावे देऊन अनेक पालकांना स्पर्म दान केले. मुलं जन्माला येईपर्यंत सगळं सुरळीत होतं, ज्यावेळी या सर्व मुलांचा गेट टुगेदर पार्टी आयोजित केली होती, यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. या सर्व मुलांचे एकमेकांचे कोणतेही नाते नव्हते तरीही ही सर्व मुल एकसारखीच दिसत असल्याचे आढळून आले. यानंतर या प्रकाराचे कारण समोर आले, हे कारण ऐकून सर्वांना धक्का बसला.
ऑस्ट्रलियामध्ये ६० जोडपी IVF तंत्रज्ञानाद्वारे पालक बनले आहेत. त्यांची ६० हून अधिक मुले या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आली. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्व पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात वेगळेच प्रकरण समोर आले. एकाच स्पर्म डोनरने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये स्पर्म दान केल्याचे समोर आले. कायद्यानुसार पकडले जाऊ नये म्हणून त्याने आपले नाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सांगितले.
यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पालकांनी संपूर्ण ऑस्ट्रेलियातील आयव्हीएफ क्लिनिकमधून त्या व्यक्तीची चौकशी केली. सिडनीस्थित 'फर्टिलिटी फर्स्ट'च्या डॉ. अॅनी क्लार्कने सांगितले की, त्या माणसाने आमच्या क्लिनिकमध्ये फक्त एकदाच शुक्राणू दान केले होते, पण तो दावा करत होता की त्याने फेसबुकच्या माध्यमातून एक जाहिरात काढून अनेकांना शुक्राणू दान केले होते. म्हणजेच काही रुग्णालयांनी फसवणूक केल्याचे समोर आले. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या दोन प्लॅटफॉर्मवरून जाहिराती देऊन त्याने लोकांना फसवले. ऑस्ट्रेलियात शुक्राणू दानात फसवणूक बेकायदेशीर आहे, अशा प्रकरणांमध्ये आरोपी दोषी सिद्ध झाल्यास 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.