सध्या सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या रिक्षावाल्याचं कौतुक कराल. तुम्हाला माहीत असेलच आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात आणि वेगवेगळे व्हिडीओज् शेअर करतात. अलिकडे असाच एक व्हिडीओ आनंद महिद्रांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रिक्षावाल्याने मास्क, सॅनिटायजर, वॉश बेसिन तसंच ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबिन ठेवले आहेत. कोविड19 ने स्वच्छ भारत मोहिमेला प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत सोशल डिस्टेंसिंग आणि साफ सफाई, तसंच हात सतत धुतल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ 10 जुलैला सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटवरील या व्हिडीओला 31 हजारांपेक्षा जास्त लाईक्स तर 5 हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर या रिक्षा चालकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या रिक्षाच्या बोर्डवर लिहिले आहे की, ही मुंबईतील पहिली होम सिस्टिम ऑटोसेवा आहे. जी रिक्षा उत्तम सोयीसुविधा देते.
कोरोनाच्या माहामारीत लोक आरोग्याबाबत जास्त जागरूकता बाळगताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित होण्यासाठी या रिक्षावाल्याने ही शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावर लोकांनी या रिक्षा चालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सगळ्यात प्रवासीसेवा पुरवत असलेल्या चालकांनी या रिक्षाचालकाचा आदर्श घ्यायला हवा. याआधीसुद्धा एका रिक्षावाल्याने आपल्या ग्राहकांना मास्क सॅनिटायजर या सेवा पुरवत प्रवासादरम्यान संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केला होता.
माणुसकीला सलाम; अंध आजोबांसाठी महिलेने भर रस्त्यात केलेली कसरत पाहून तुम्हीही कराल कौतुक
धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना