नवी दिल्ली: अयोध्येतल्या भव्य राम मंदिरासाठी (Ayodhya Ram Mandir) गेल्या ४४ दिवसांपासून निधी गोळा केला जात आहे. काल (शनिवारी) निधी संकलन अभियानाची सांगता झाली. गेल्या दीड महिन्यांत अनेकांनी राम मंदिरासाठी यथाशक्ती दान केलं. त्यात सर्वसामान्यांपासून राजकारणातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र राम मंदिरासाठी एका व्यक्तीनं दिलेल्या २ लाख १४ हजार २१४ रुपयांच्या धनादेशाची सर्वत्र चर्चा आहे.सोशल मीडियावर 'रामराम' म्हणून व्हायरल झालेल्या धनादेशामागे एक विशेष कारण आहे. राम मंदिरासाठी २ लाख १४ हजार २१४ रुपयांचं दान देणाऱ्या व्यक्तीनं धनादेशावर हा आकडा इंग्रजीत लिहिला आहे. हा आकडा (2,14,214) असा लिहिण्यात आला आहे की तो वाचताना देवनागरीत 'रामराम' असाही दिसतो. त्यामुळे धनादेश लिहिणाऱ्या सर्जनशीलतेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
रामराम! अनेकांनी दिलं राम मंदिरासाठी दान; पण 'हा' चेक ठरतोय सर्वाधिक चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 12:12 PM