काहीवेळा अशा काही गोष्टी घडतात की भल्या भल्यांची भंबेरी उडते. माणूस कितीही तगडा असू दे पण सापाला पाहिल्यावर कोणाचीही पाचावर धारण बसू शकते. सापाची धडकी भल्या भल्यांची झोप उडवते. अशीच एक गोष्ट नाशिक-मध्यप्रदेश महामार्गावर घडलीये. पावसाळ्यात सापाचं दर्शन रानावनात, आडवाटेवर जास्तीतजास्त रस्त्यात होऊ शकतं. पण समजा तुम्हाला गाडीच्या काचेवर साप दिसला तर तुमची काय गत होईल? याचा थरारक व्हिडिओ News18 लोकमत च्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आला आहे.
त्यानंतर सर्पमित्र प्रेम ब्रिहाडे यांना बोलावले. गाडीच्या मागच्या बाजूला सर्प गेल्याने दहिवद येथील हॉटेल पद्मावतच्या बाजूला सर्विस स्टेशनच्या रॅम्पवरगाडी चढून अथक प्रयत्नातून सापला अखेर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आलं. तोपर्यंत ड्रायव्हर आणि आतील प्रवाशांनी जीव मुठीत धरुन प्रवास केला होता.