आईवडील मग मनुष्य असो किंवा प्राणी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. त्यासाठी ते वेळी आपल्या प्राणांची देखील बाजी लावू शकतात. स्वत:च्या पाण्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी जे काही केलं ते पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल. या हत्तींची धडपड फक्त एक आईवडिलच समजु शकतात...
या व्हिडीओत पाहू शकता की, एक हत्ती (Elephant)आपल्या पिल्लासोबत पाणी पित आहे. पाणी पिता पिता अचानक पिल्लाचा पाय घसरतो आणि ते त्या पाण्यात पडतं. पाणी खोल आहे. त्यामुळे पिल्लू गटांगळ्या खातं. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी ते आपले पाय मारतं. त्याच्यासोबत असलेली त्याच आई त्याला वाचवण्यासाठी धावते. ती पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच थोड्या अंतरावर असलेला त्या पिल्लाचे पिता असेलेला हत्तीसुद्धा तिथं धावत येतो. मग दोघंही पाण्यात उतरतात. पळत पळत पिल्लाजवळ जातात आणि दोघं दोन्ही बाजूंनी त्याला धरतात. हळूहळू करत ते त्याला जिथं पाणी खोल नाही त्या भागाजवळ नेतात आणि नंतर पाण्यातून बाहेर काढतात.
hopkinsBRFC21 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक भावूक प्रतिक्रिया येत आहेत. लोक हा व्हिडिओ रीट्वीट, लाईक करत आहेत.