सोशल मीडियावर प्राण्यांचे आणि पक्ष्याचे फोटोज व्हायरल होत असतात. लॉकडाऊनमुळे सर्वचजण आपापल्या घरात बंद असल्यामुळे जंगलातील प्राण्यांनी रस्त्यावर संचार करायला सुरूवात केली. त्यामुळे नेहमीच गर्दी असलेल्या रस्त्यांवर प्राण्यांचा वावर दिसून आला. आता सोशल मीडियावर सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
हा फोटो पाहून तुम्हालाही हसायला येईल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीचं पिल्लू ऊसाच्या शेतात उभा राहून लपण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा या हत्तीच्या पिल्लाला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली त्यावेळी त्याने वीजेच्या खांबाआड लपण्याचा प्रयत्न केला आहे. थायलँडच्या चिंगमई भागातील हे दृश्य असल्याचे समोर आले आहे. खांबाच्या आड लपल्यास आपल्याला कोणीही पाहू शकणार नाही. असं या हत्तीच्या पिल्लाला वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून या हत्तीच्या पिल्लाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हत्तीणीचा वाढदिवस साजरा केला.
काही दिवसांपूर्वी श्रीकुट्टीने नावाच्या हत्तीच्या पिल्लाने आपला पहिलाच वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. केरळमधील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात वाढदिवस साजरा करण्यात आला होता. श्रीकुट्टीला एका जंगलात गंभीर दुखापतीतून वाचवण्यात आले होते. दुर्घटना घडली तेव्हा श्रीकुट्टी अवघ्या दोन दिवसांची होती. श्रीकुट्टीची जीवंत राहण्याची शक्यताही कमीच होती, पण मुख्य वन पशु चिकित्सा अधिकारी (आरडीटी) डॉ. ईस्वरन यांनी श्रीकुट्टीची विशेष काळजी घेतली आणि तिला बरं केलं. कौतुकास्पद! ७ वर्षांच्या चिमुरड्यानं एका मिनिटात मारले ५७१ बॉक्सिंग पंच; अन् केला वर्ल्ड रेकॉर्ड
केळे आणि नारळाच्या पाण्याच्या आरोग्यदायी आहाराबरोबरच भरपूर प्रेम आणि देखभाल केल्यानंतर श्रीकुट्टी पूर्णपणे बरी झाली. श्रीकुट्टी फक्त वाचली असे नाही, तिची आता चांगली वाढ देखील होत आहे. श्रीकुट्टीला वाढदिवसानिमित्त एक शाल देखील भेट देण्यात आली होती. या बरोबरच तांदुळ आणि नाचणीपासून तयार करण्यात आलेला केक बनवून तिला खायला दिला गेला. भारीच! आता मास्कमुळे चष्म्यावर येणार नाही फॉग; व्हायरल झाली डॉक्टरांची भन्नाट ट्रिक