Poor Kids Dinner At 5 Star Restaurant : असं म्हणतात की, जेव्हा एखाद्या भूकेलेल्या व्यक्तीचं पोट भरलं जातं तेव्हा ते मनापासून आशीर्वाद देतात. असंच काहीसं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत बघायला मिळालं. एका व्यक्तीने अशा मुलांना जेऊ घातलं जे रस्त्यावर नेहमीच गाड्यांच्या काचा स्वच्छ करतात आणि पोट भरण्यासाठी पैसे गोळा करतात. ही मुलं फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण विकत घेऊ शकत नाहीत. पण तिथे जाण्याचं स्वप्न नक्कीच बघतात. या व्यक्तीने त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. या मुलांना त्याने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण खाऊ घातलं.
इंस्टाग्रामवर कवल छाबडा (@kawalchhabra) ने एक मनाला भिडणारा रील शेअर केलं आहे. या पोस्टने जगभरातील लाखो लोकांचं मन जिंकलं आहे. या व्हिडिओत मुलांचा आनंद पाहून अनेक लोक भावूक झाले आहेत. व्हिडिओत तुम्ही काही मुलांना रस्त्यावरील गाड्यांच्या काचा साफ करताना बघू शकता. तेव्हाच एक व्यक्ती आपल्या गाडीच्या खिडकीची काच खाली करतो आणि या मुलांना जेवणाबाबत विचारतो. त्यानंतर कवल छाबडाने त्यांना आपल्या कारमध्ये बसवलं आणि एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेले.
कवल यानी मुलांच्या आवडीच्या अनेक डिशेज मागवल्या आणि त्यांच्यासोबत पोटभर जेवणही केलं. जेवणानंतर सगळी मुले खूप आनंदी दिसत आहेत. त्यांनी पिझ्झापासून ते अनेक आवडीच्या पदार्थांवर ताव मारला. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर फार आनंदी दिसत आहेत. लोकांनी या व्हिडिओवर अनेक चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत.