Banana Viral Video : फळांचं सेवन आपल्यासाठी फार महत्वाचं असतं. फळं-भाज्यांमधून आपल्याला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. जर फळं आणि भाज्या नसतील तर लोक औषधांच्या माध्यमातून यांची कमतरता भरून काढतात. फळं आणि भाज्या खूप आधीपासून आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. पण आजकाल फळं-भाज्यांवर वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो.
सोशल मीडियावर एका महिलेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो लोकांना हैराण करत आहे. या व्हिडिओत महिलेने केळीवरील एक खासप्रकारचा डाग दाखवला. यासोबतच लोकांना इशारा दिला की, जर तुम्हाला केळीवर असा पांढरा डाग दिसला तर केळी चुकूनही खाऊ नका. जर तुम्हाला हा डाग दिसला तर केळी फेकून द्या.
अनेकदा आपण केळी विकत घेतो, तेव्हा त्यावरील डाग बघत असतो. हे डाग असूनही अनेकदा आपण केळी विकत घेतो. आपल्याला वाटतं की, हे डाग सालीवर आहे. आत त्यांचा काही प्रभाव होत नसेल. पण ही चूक आपण करतो. मुळात ज्याला आपण पांढरा सामान्य डाग समजतो ते कोळींच्या अंड्यांचं घर आहे. जर तुम्ही ते फोडलं तर त्यातून कित्येक कोळी बाहेर निघतील.
महिलेने व्हिडिओत सांगितलं की, जर तुम्ही केळींवर असा पांढरा डाग दिसला तर केळी लगेच फेकून द्या. यात अनेक कोळी राहतात. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आणि हा व्हिडीओ पाहून लोक म्हणाले की, त्यांनीही अनेकदा असा पांढरा डाग दिसल्यावरही केळी खरेदी केल्या आहेत. पण आता पुढे ते अशी चूक करणार नाही.