पंजाबमधील भटिंडा येथे राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाने एक मिनिट ३५ सेकंदात हनुमान चालिसाचा पाठ करून इतिहास रचला आहे. गीतांश गोयल असं या मुलाचे नाव आहे. या मुलाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील गीतांशच्या या कामगिरीवर खूप आनंदी आहेत. त्यामुळेच ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात त्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हत्तीने शोधून काढली ड्रग्सने भरलेली बॅग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
२०१८ मध्ये, हजारीबाग, झारखंड येथे राहणाऱ्या युवराज या पाच वर्षाच्या मुलाने एक मिनिट ५५ सेकंदात हनुमान चालिसाचे पठण केले होते. त्यानंतर त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. चार वर्षांनंतर म्हणजेच २०२२ मध्ये युवराजचा रेकॉर्ड गीतांशने मोडला. अवघ्या एका सेकंदाने त्याने हे विजेतेपद पटकावले. त्यानंतर गीतांशने एक मिनिट ५४ सेकंदात हनुमान चालिसाचे पठण केले.
आता स्वतःचाच विक्रम मोडत गीतांशने एक मिनिट ३५ सेकंदात हनुमान चालिसा पठण करून नवा विक्रम केला आहे. मुलाच्या या कामगिरीने गीतांशचे कुटुंब खूप उत्साहित आहे. साधारणपणे एवढ्या लहान वयात हनुमान चालीसाचे स्मरण करणे खूप कठीण मानले जाते, पण या मुलाला हनुमान चालीसा अतिशय वेगाने पाठ करण्याचा विक्रमही केला आहे.