बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरुत काल दोन भीषण स्फोटांनी हादरली. यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बैरुतमध्ये झालेल्या स्फोटांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमधून स्फोटांची तीव्रता लक्षात येते. आसपासच्या १० किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू गेले. आसपास असलेल्या कित्येक किलोमीटरील घरांच्या काचा फुटल्या. छतांचं मोठं नुकसान झालं. एका बाजूला बैरूतमधील स्फोटांची भीषणता दाखवणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे या धडकी भरवणाऱ्या क्षणीदेखील काही जण अतिशय धीरादात्तपणे उभे राहिले. बैरूतमधल्या एका रुग्णालयातल्या नर्सचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नर्सचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. संकटाच्या काळातही न डमगमता काम करणाऱ्या या नर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बैरुत स्फोटांमधील सर्वात शक्तीशाली फोटो असं या फोटोचं वर्णन करण्यात आलं आहे.
Beirut Blast: ड्युटी फर्स्ट! स्फोटांनी समोरच्या काचा फुटल्या; पण 'ती' नर्स तीन बाळांना घेऊन कामात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:09 PM